युरीया खरेदीसाठी मोठी गर्दी
विहामांडवा । वार्ताहर
यूरीया खताची चणचण आणी आज कृषी सेवा केन्दाच्या दुकानावर युरीया खत उपलब्ध झाल्याने यूरीया खत खरेदीसाठी शेतकर्यांनी एकच गर्दी केली होती ,खत खरेदीसाठी शेतकर्यांनी लाबच लाब रागा लावल्या होत्या. यावर्षी वेळेवर सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्या ऊरकल्या पेरले ते ऊगवल्याने, पीकाना खताची आवश्यकता मुळे युरीया खताची मागणी वाढली होती व त्याततच युरीयाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.
आज विहामांडवा येथील दिपक कृषी उद्योग केंद्र येथे आरसीएफ कंपनीच्या उज्वला युरीया खताची प्रत्येक शेतकर्यांस दोन असे एकोनावीस टन युरीया चे वाटप करण्यात आले ,यावेळी ,दुकानदार दिपक कासलीवाल, पंकज कासलीवाल, व अनिल गाभुड,, यांनी नियोजन करुन खताचे वाटप केले. युरीया पुरला नाही, शेकडो शेतकरी रिकाम्या हाताने परत गेले. युरीया चे वाटप होणार हे समजताच शेकडो शेतकरी बांधवांनी रांगा लावल्या, परतू खत फक्त ऐकोनावीस टण उपलब्ध असल्याने शेतकरी रिकाम्या हाताने परत गेले, विहामांडवा हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून पंचवीस खेड्यातील लोक खत खरेदी करण्यासाठी विहामांडवा येथे येतात, तरी संबंधित विभागाने विहामांडवा येथे जास्तीत जास्त युरीया खताचा पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली,
Leave a comment