भराडी । वार्ताहर
उपेक्षित दलित शोषित, पीडीत, कष्टकर्याच्या संघर्षशील जीवनाच्या व्यथांची समर्थपणे चित्रण आपल्या साहित्यातून शब्दबद्ध करीत त्याच्या दुखाचे स्पनदने जगाच्या पटलावर मांडले असून अण्णाभाऊचे साहित्य जगभरात उपेक्षिताच्या व्यथाचे मांडण्याचे दीपस्तंभ होय असे प्रतिपादन डॉ सचिन साबळे यांनी केले आहे.
विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंच व कै. विष्णुपंत साबळे प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमिताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. या वेळी प्रा. अनिल साबळे, सौ. अंजली साबळे, स्नेहल साबळे, प्रियंका सोनावणे आदिची उपस्थिती होती.
Leave a comment