खुलताबाद । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुलताबाद शहरात शिक्षण विभागामार्फत प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.या प्रसंगी शिक्षकांची सर्वेक्षण टीम नेमण्यात आली सदरील टीम शहरातील प्रत्येक वार्डानुसार सर्व कुटुंबांचे आरोग्य तपासणी करित आहे. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याबद्द्ल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
सद्यास्तिथि कोरोना विषाणुंची कोणतेही लक्षण नसलेले नागरिक देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात येत आहे.या सर्वेक्षणामुळे भविष्यात कोरोनाचा प्रभाव पसरु नये या अनुषंगाने कुटुंबातील सर्व सदस्यांचे ऑक्सीजन लेवल, तसेच सर्दी, खोकला, ताप आदि बाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटरच्या सहाय्याने स्क्रीनिंग करुन आरोग्य तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वार्डातील नगरसेवकांच्या सहकार्याने सर्वेक्षण होत आहे.या प्रसंगी आज साळीवाडा येथील नगरसेविका सुलताना परवीन व मिर्झा अब्बास बेग यांच्या सर्व कुटुंबाची तपासणी सीमा रहमान शेख व शबनम पटेल यांनी केली.तसेच यांच्या सहकार्याने साळीवाडा, इमाम बाड़ा, बड़ा दरवाजा, आदि परिसरात सर्व कुटुंबांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
Leave a comment