सिल्लोड । वार्ताहर
महाराष्ट्र महाविकास आघाडी चे राज्य सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी च्या काळातील शेतकर्याचे शेतीसाठी उपयोगी व घरगुती विज बील संपूर्ण माफ करावे अशी मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब, अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जा मंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र्र चे प्रधान सचिव, औरंगाबाद विभागीय विभागीय आयुक्त (महसूल) श्री केंद्रेकर , औरंगाबाद जिल्हाधिकारी श्री उदय चौधरी आणि सिल्लोड तालुका चे उपविभागीय अधिकारी श्री ब्रिजरेश पटेल यांना तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या व ईमेल द्वारे निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून मा.ना मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे यांनी ईमेल द्वारे कळविले की, सदरील मागणी चे निवेदन पुढील कार्यवाही साठी संबधित विभागाकडे पाठवले असल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने दिनांक 23 मार्च 2020 या महिन्या पासून सतत लॉकडाऊन व संचारबंदी लागू करून तसेच जनता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तरी पण औरंगाबाद जिल्हात मोठया प्रमाणात नवीन रूग्ण वाढत असून ते जिल्हात 9 नऊ हजारांच्या वर कोरोना साथीचे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुर, हात कामगार, छोटे व मध्यम वर्गीय व्यापारी वर्ग, बांधकाम मजूर , वाहन चालक व सहयोग, आदि नागरिक आर्थिक संकट ग्रस्त होऊन मध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती विज बील भरू शकत नाही तसेच शेतकरी सुध्दा शेतीचे विज बील भरू शकत नाही. त्यांना आपल्या कुटुंबासह जगणे फार कठीण होते आहेत म्हणून शासनातर्फे त्यांचे घरगुती व शेतीचे विज बील माफ करणे आवश्यक आहेत. परंतु विधूत वितरण कंपनी लॉकडाऊन व संचारबंदी च्या काळात विजेचे चार महिन्याचे एकदम मोठी रक्कम मे चे बिल देऊन वसूली करत आहेत ते तात्काळ थांबवून महाराष्ट्र राज्य सरकारने माध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती व शेतकर्याचे शेती उपयोगी विज बील तात्काळ संपूर्ण माफ करण्यात यावे असे निवेदनात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी ईमेल द्वारे संबंधिताना कळविले आहे.
Leave a comment