औरंगाबाद । वार्ताहर
आज गुरूवारी येथील पीएस कॉलेज कोव्हिड सेंटर मधून पाच रूग्ण बरे होऊन त्यांना आज घरी पाठविले आहे या पाच रूग्णांना महानगरपालिका आरोग्य अधिकारी निता पाडळकर व येथील डॉक्टर व स्टाफ यांच्या हस्ते गुलाबाचे पुष्प देऊन डिस्चार्ज करण्यात आले आहे. पनचक्की जवळ असलेल्या पीएस कॉलेज मध्ये कोव्हिड सेंटर बनविले आहे. या कोव्हिड सेंटर मध्ये 103 कोरोना बाधित रूग्ण आहे. या कोव्हिड सेंटर मध्ये दहा दिवस बाधित रूग्णांना ठेऊन बरे करून डिस्चार्ज देण्यात येत आहे. आज या कोव्हिड सेंटर मधून पाच रूग्णांचा उपचार करून बरे करण्यात आले होते. आरोग्य अधिकारी निता पाडळकर बरे झालेले रूग्णांना गुलाबाचे पुष्प देऊन तसेच येथील डॉक्टर, नर्स, सोबत असलेले रूग्णांनी टाळ्या वाजून बरे झालेले रूग्णांना निरोप दिला आहे. यावेळी कोव्हिड सेंटर मध्ये सेवा करीत असलेले डॉ शिंदे नोडल अधिकारी,डॉ. शकील शेख, डॉ सोहेल,डॉ आमरीन सय्यद,डॉ यासिन पटेल,डॉ पराग अंबोरे,आदींची उपस्थित होते.
यावेळी डॉ निता पाडळकर यांनी सांगितलं की, औरंगाबाद शहरात जवळपास दोन हजारच्या जवळ विविध कोव्हिड सेंटर मध्ये बाधित रूग्ण उपचार घेत असून तसेच 100% रूग्ण बरे होऊन घरी जात आहे. आज प्रथमच या कोव्हिड सेंटर मधून पाच रूग्ण बरे होऊन जात आहे आनंदाची बाब आहे. येथील स्टाफ डॉक्टर, नर्स तसेच साफसफाई कर्मचारी साफसफाईकडे लक्ष देत आहे. आमच्या डॉक्टरही रूग्णांना वेळोवेळी लक्षठेवून असतात रूग्णांची तपासणी वेळोवेळी करण्यात येत असते तसेच रूग्णांच्या जेवण्याची व्यवस्था येथील स्टाफमुळे हे साध्य होत आहे. महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी या पाच रूग्णांना दहा दिवस कोरोंटाईन करून उपचार करून बरे केल्याने व बरे होऊन आम्ही घरी चाललो आहोत कोव्हिड सेंटर मधल्या डॉक्टरांचे व स्टाफचे आभार मानले. या कोव्हिड सेंटर मध्ये 103 रूग्णांनापैकी काही लहानमुले, महिला, पुरूष आहे. येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
Leave a comment