सिल्लोड । वार्ताहर
येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा पहिल्याच वर्षी 100 टक्के निकाल आला आहे. तसेच साक्षी खाकरे 88.92 टक्के गुण मिळवून ही विद्यार्थीनी प्रथम आली आहे. मयुरी साबळे 88.76 टक्के व्दितीय, प्रतीक्षा सोन्ने 88.30 टक्के तृतीय क्रमांक मिळविला आहे.
तसेच अनुपमा पाटेवड 86.15 टक्के, जयश्री पाटील 84.92 टक्के, पूनम तांगडे 84.76 टक्के, वैष्णवी घोडके 84.30 टक्के, शुभम शिंदे 80.76 टक्के, आकाश मनगटे 80.15 टक्के, या विद्यार्थ्यांनी सुद्धा 80 टक्याच्या वर गुण घेतले आहे तसेच इतरही सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव सुनिल पाटील, कार्यकारी संचालक सौ.राजश्री पाटील, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचारी, पालकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment