अजिंठा डोंगररांगा सभोवती तार कंपाउंड उभारणार-राज्यमंत्री अब्दुल सत्तार
भराडी । वार्ताहर
डोंगररांगांसभोवतालच्या शेतक-यांचे अनेक हेक्टर वरिल पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस करण्यात येत असुन आपापल्या पिकांचे राखन करण्यासाठी परिसरातील शेतक-यांना राञ - राञ जागुन वन्यप्राण्यांपासुन पिके बचावतांना आपला जीव मुठीत धरून पिकांचा बचाव करावा लागत आहे. अनेकदा शेतक-यांना परिसरात व्याघ्रदर्शनही होत असल्याने परिसरातील शेतक-यांमध्ये घबराट असते.अशा भयावह परिस्थितीत अजिंठा डोंगररांगांसभोवतलचा बळीराजा आपले जीवन कंठीत असुन अजिंठा डोंगररांगांसभोवती तार कंपाउंड उभारण्यात यावे असी मागणी राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे नाना पाटील गव्हाणे, राहुल गव्हाणे, पांडुरंग गवळी,संतोष लहाने, शंकर नरवाडे, नितीन लोखंडे, आदिंसह शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.
सराटी, बोदवड, जळकी, वसई. डकला, हळदा, पिंपळदरी आदी गावांतील डोंगर रांगांलगतच्या शेतकर्यांनी अनेक हेक्टर क्षेत्रावरील मका, कपाशी, ज्वारी, मिरची, सोयाबीन, बाजरी, तूर, भुईमूग आदी पिकांची पेरणी दर वर्षा प्रमाणे याही वर्षी केली आहे. शेतकर्यांनी पेरा केलेल्या या पिकांची वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नासधूस करीत फस्त करीत आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांसह शेतकर्यांच्या स्वतःच्या जीवालाही सतत धोका असतो या संकटातून बचाव करण्यासाठी डोंगररांगेच्या सभोताली संरक्षण म्हणून किमान तारेचे कुंपण लावावे अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आली . राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत वनपरिसरासभोवती लोखंडी कंपाऊंड उभारण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
Leave a comment