दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 144 जणांना (मनपा 132,ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5499 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 379 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 294, ग्रामीण 85 ) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9444 झाली आहे. आजपर्यंत एकूण 370 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3575 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सायंकाळनंतर 216 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 125 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 25 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 87, ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळलेले आहेत. सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (81)
एन अकरा, सिडको (8), हर्सुल (3), राजमाता जिजाऊ नगर (1), शंभू नगर (4), उल्कानगरी (1), सातारा परिसर (3), स्वामी विवेकानंद नगर (1), चेलिपुरा (2), अरुणोदय नगर (1), एन नऊ सिडको (1), बीड बायपास (6), भवानी नगर (1), रामकृष्ण नगर (1), एन सहा सिडको (3), जय विश्वभारती कॉलनी (2), सिद्धी अपार्टमेंट (1), सेव्हन हिल कॉलनी (3), सुरेवाडी (1), बंबाट नगर (1), भानुदास नगर (2), अंगुरी बाग (1), एन बारा (1), जय भवानी नगर (1), भारत नगर, गारखेडा (1), कैलास नगर (1), अन्य (1),भीम नगर (10), पद्मपुरा (7), भीमपुरा (2), सोनार गल्ली (1), लक्ष्मी नगर (1), नंदनवन कॉलनी (1), कोकणवाडी (1), क्रांतीनगर (1), छावणी (1), मिटमिटा (2), अविष्कार कॉलनी (1), सावरकर नगरी (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (23)
अविनाश कॉलनी, वाळूज (1), मातोश्री नगर, रांजणगाव (2), साठे नगर, वाळूज (4), बोरगाव (2), घानेगाव, वाळूज (1), पैठण (3), वैजापूर (1), सिल्लोड (9)
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (25)
पिसादेवी (2), हर्सूल (2), बजाज नगर (1), तुर्काबाद खराडी (3), असेगाव (1), जोगेश्वरी (1), उस्मानपुरा (1), पाचोरा (1), बेगमपुरा (1), कासलीवाल मार्व्हल (1), गेवराई तांडा (2), नक्षत्रवाडी (3), कांचनवाडी (4), जे सेकटर मुकुंदवाडी (2)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत अंगुरीबाग येथील 53 वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयातील 63 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment