फर्दापूर । वार्ताहर
सहा कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या फर्दापूर (ता.सोयगाव) येथील कंटेनमेंट झोन परीसराला उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दि.15 बुधवारी भेट देवून पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार प्रविण पांडे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे तलाठी सुरज गिरी उपसरपंच शेख सत्तार भीमराव बोराडे डॉ.इंद्रसिंह सोळूंके आदीची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी स्थानीय प्रशासना कडून राबविण्यात येणार्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन कंटेन्मेंट झोन परीसरा सह संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करुन गावातील 55 वर्षापुढील नागरीकांची दरोज आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना केल्या दरम्यान यावेळी आरोग्य विभागा कडे रुग्णवाहिका नसल्याने फर्दापूर येथील सहा कोरोना बाधित रुग्णांना दि.13 मंगळावर रोजी दिवसभर रुग्णवाहिकेची वाट बघत ताटकळत बसावे लागले असल्याची बाब पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली असता आरोग्य विभागाला लवकरच एक वाहन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी देवून आरोग्य विभागासाठी तात्काळ एक खाजगी वाहन अधिग्रहीत करण्याची सूचना तहसीलदार प्रविण पांडे व ग्रामविकास अधिकारी सुनिल मंगरुळे यांना केल्या असून कोव्हीड 19 संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
फर्दापूरकरांना दिलासा बाधितांच्या संपर्कातील सातही जण निगेटिव्ह
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या फर्दापूर येथील सात नागरिकाच्या स्वॅब चे नमूने दि.14 मंगळावर रोजी आरोग्य विभागाने घेतले होते सदरील स्वॅब चा कोव्हीड 19 चाचणी अहवाल दि.15 बुधवारी दुपारी प्राप्त झाला असून बाधितांच्या संपर्कातील सात ही लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने फर्दापूरकरांना दिलासा प्राप्त झाला आहे मात्र बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना चौदा दिवसापर्यंत होम कोरोंटाइनच रहावे लागणार आहे.
Leave a comment