खरीपाचे क्षेत्र पाण्याखाली 

सोयगाव । वार्ताहर

सोयगावसह तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होवून पावसाच्या पाण्याने खरीपाचा हंगाम पाण्याखाली आला आहे. पाण्याखाली आलेल्या खरिपाच्या हेक्टरी आकडेवारी हाती आलेली नसून मात्र शेतकर्‍यांना हा पावूस मोठा नुकसानदायक ठरला आहे.

सोयगाव तालुक्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या रिपरिपमुळे बुधवारी निसर्गाचा लॉकडाऊन झाला होता.पावूस सुरूच असल्याने घराच्या बाहेर कोणीही पडले नसल्याने पुन्हा सोयगाव तालुक्यात पावसाने लॉकडाऊन केला होता. मात्र या पावसामुळे पहाटे पासूनच जनजीवन विस्कळीत होवून शेती कामेही ठप्प झाली होती.पहाटे पासूनच आकाशाने अजिंठ्याच्या डोंगराला गवसणी घातली होती.त्यामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य निर्माण झाले होते.श्रावणाआधीच सोयगाव तालुक्यात श्रावणाचे वैभव दिवसभरच्या पावसाने जंगलाला लाभले होते.डोंगराला नभांनी गवसणी घातल्याने या दृश्याच्या सोंदर्यमध्ये पुनः भर पडली होती. दिवसभर सुरूच असलेल्या पावूस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयगाव तालुक्यात सूर्यदर्शन झाले नव्हते.त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज आल्याने घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय तालुकावासियांनी घेतला होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.