औरंगाबाद । वार्ताहर
इटखेडा-पैठण रोड येथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे शंभर टक्के निकालाची यशोपरंपरा कायम राखली आहे. 15 जुलै 2020 रोजी आलेल्या सी.बी.एस.ई. बोर्डच्या निकालानुसार शाळेचे सर्वच्या सर्व 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 16 विद्यार्थ्याांना 90% व त्यापेक्षा जास्त, 30 विद्यार्थ्यांना 80% व त्यापेक्षा जास्त, 30 विद्यार्थ्यांना 70% व त्यापेक्षा जास्त आणि 55 विद्यार्थ्यांना 60% व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले.
मानव जैन 95.60%, समीर धांडे 94.60 % , राजेश प्रधान 94.40 % , साईप्रिया अग्रवाल 93.80%, कुणाल सारडा 93.60%, पार्थ नागोरी 92.80%, देवीका चुत्तर 92.60% , पराग पाटनी 92.60% , वरद दगडिया 92.40% , रिचा आस्टेकर 92.40% , वेदांन्ती घुगरकर 91% , आर्चनादेवी पाल 90.60%, ईश्वरी दरक 90.60%, आदित्य पांचाल 90.60%, आदिती गोयकर 90.20%, नकुलदेव नायर 90% गुण मिळविले. शाळेचे अध्यक्ष सत्यनारायण रतनलाल अग्रवाल, उपाध्यक्ष प्रफुल्लकुमार अग्रवाल, सचिव अॅड.मुकेश गोयंका, कोषाध्यक्ष सत्यनारायण रामगोपाल अग्रवाल, शालेय कार्यसमिती तथा सर्व विश्वस्त आणि शाळेचे प्राचार्य सुभाष धवन यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment