औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 18 जुलै पर्यंत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन केल्याने महानगर पालिकेअंतर्गत करण्यात येणारी अनेक विकास कामे ठप्प झाल्याने आज भाजपच्या माजी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे शहराच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीत पाणी व कचर्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला आहे, त्यावर लवकर तोडगा काढा, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी (ता.15) केली. भाजपचे माजी गटनेते प्रमोद राठोड यांनी ही बैठक ऑनलाइन पद्धतीने घेत आपल्या समस्या मांडण्याची संधी भाजपच्या नगरसेवकांना उपलब्ध करून दिली. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे केल्या जाणार्या उपाययोजना चांगल्या आहेत. त्याबद्दल प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचे अबीनदान केले. श्री. पांडेय यांनी प्रत्येकाच्या समस्या ऐकून घेतल्या. यावर तातडीने प्रशासकीय निर्णय घेण्याचे आश्वासन ऑनलाईन बैठकीत भाजपच्या नगरसेवकांना दिले.
कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील इतर प्रश्नांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सध्या प्रशासकांना महापालिकेत जाऊन भेटणे शक्य नसल्यामुळे त्यात श्री. राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान घडमोडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, बालाजी मुंडे, प्रदीप बुरांडे, रामेश्वर भादवे, ड. माधुरी अदवंत, सुनील नाडे, गोविंद केंद्रे, राहुल रोजतकर आदी सहभागी झाले होते. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी व क्वारंटाईन सेंटर तसेच कोविड केअर सेंटरमध्ये दिल्या जाणार्या सुविधांबाबत माजी नगरसेकांनी प्रशासकांचे कौतुक केले. मात्र नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही, सिडको भागात कचर्याच्या गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकणी पावसाचे पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्यता आहे, यासह वॉर्डातील समस्या प्रत्येकांनी मांडल्या. होम क्वारंटाईन संदर्भात प्रशासनाने विचार केला पाहिजे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. पॉझिटीव्ह अहवालाबाबत नागरिकांमधील गैरसमज दूर करा, रुग्णांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणी घडमोडे यांनी केली. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची प्रशासनला संधी असल्याचे राठोड म्हणाले.
रिपोर्टमध्ये ढिसाळपणा
एक महिला कोरोनाबाधित नसल्याचे कोरोना तपासणीत आढळले मात्र पुन्हा दुसर्या तपासणीत त्याच महिलेला कोरोनाबाधित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी तापसणीतच गोंधळ करून मनपाच्या आरोग्य विभागाने तपासणी क्रमांकाचा घोळ केला. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणी जबाबदारीने करावी अशी सूचना प्रमोद राठोड यांनी ऑनलाईन बैठकीत मांडली.
डाऊनलोड करा, बेडची माहिती मिळेल
माधुरी अदवंत यांनी नागरिकांनी उपलब्ध बेडची माहिती मिळावी, अशी मागणी केली. त्यावर श्री. पांडेय यांनी ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ प डाऊनलोड करा, त्यात दिवसातून तीनवेळा बेड संदर्भातील माहिती अपडेट केली जाते, असे स्पष्ट केले.
फक्त एक तक्रार
नाक्यावर पॉझिटीव्ह आलेला अहवाल शहरात आल्यावर स्वॅब घेतला असता निगेटीव्ह आला. हे कसे का? असा प्रश्न प्रशासकांना करण्यात आला. त्यावर आत्तापर्यंत स्वॅब संदर्भात एकच तक्रार आल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment