बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव वाडी ता.सिल्लोड येथे 16 होमक्वाँरटाईन केलेल्या रुग्णामधील सर्वाचे स्वँब घेण्यात आले होते,त्यातील 8 निगेटिव्ह, तर 8 जणाचे रिपोर्ट पाँझिटिव्ह निघाल्याने आता वाडीत रुग्ण संख्या 9 झाल्याने बोरगांवकराची धाकधुक वाढली. ग्रामिण भागात कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली असुन रवीवारला बोरगाव वाडीगावात एक कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आला होता,त्यामुळे परिसरात एकच धावपळ झाली होती व त्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील 16 जणाना होम क्वाँरनटाईन करण्यात आले होते, त्यानतंर तिसर्या दिवशी म्हणजे दिनांक 14 वार मंगळवारी सिल्लोड येथे त्यातील 5 जणाचे स्वँब घेऊन त्यांना वापस बोरगांव वाडी येथे पाठवुन देण्यात आले होते, त्या पाच जणामधील दोन जणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह तर तीन जणाचे निगेटिव्ह आल्याने रिपोर्ट मिळाल्यानतंर बोरगांव व परिसरात खळबळ उडाली आहे.
काल स्वँब देऊन सदरील पाच जणाना सिल्लोड येथे क्वाँरनटाईन करायला पाहीजे होते, कारण कि ते निगेटिव्ह व पॉझिटिव्ह एकाच कुटूबांतील असल्यामुळे राञभर एकञ वास्तव्यास (संपर्कात) होते, व काल दिनांक 14 रोजी सिल्लोड येथे स्वँब साहीत्याच्या तुटवड्यामुळे 11 जणाना स्वँब देता आले नव्हते,त्याचे स्वँब आज दिनांक 15 रोज बुधवारी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेन्टर येथे स्वँब घेऊन त्याना पुढील उपचारासाठी अजिंठा कोविड सेंन्टरमध्ये पाठविण्यात आले आहे, त्यांचा संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये 8 जणाचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले तर 8 निगेटिव्ह निघाल्याने व आता एकाच कुटुंबातील 9 लोकांना ही लागण झाली आहे.अशी माहिती वैद्यकीय आधिकारी योगेश राठोड यांनी दिली, आरोग्य व पोलीस यंत्रणेनेकडुन तो सर्व परिसर कंटेंमेंट झोन जाहीर केला व सोडिअम हायपोक्लोराँईड औषधीची फवारणी व निर्जतुकिकरण करुव सील करण्यात आहे, ग्रामिणभागात कोरोना बाधीताचा वाढता आकडा हा नागरीकाच्या वतीने करण्यात येणार्या निष्काळजीपणा, सामाजिक अतंर न पाळने यामुळे वाढत असल्याचे निदर्शनास येत आले आहे. तरी सर्व नागरिकांनी शासनाने ठरवुन दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करा,तोडाला मास्क किवा रुमाल वापरा,आपले हाथ नियमित स्वच्छ धुवा,विनाकारण घरा बाहेर पडु नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे अहवाहन आरोग्य, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाकडुन वारंवार करण्यात येत आहे.
Leave a comment