भोकरदन । वार्ताहर
तालुक्यातील मौजेगोकुळ येथील श्री नवनाथ महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. कौतिकराव महाराज टेकाळे यांचे दि 14 रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान वृद्धापकाळाने निधन (वैकुंठ गमन) झाले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपूर्वी श्री श्री श्री 1008 श्री योगिराज दयानंद महाराज यांच्या शुभहस्ते येथील पिर समाधी तथा नवनाथ महाराज पावन मूर्तींचे तसेच मंदिरांचे भूमिपूजन करण्यात आले होते.
तेव्हापासून येथील पीर संस्थान आणि नवनाथ महाराज मंदिर संस्थानचे सर्व कामकाज तसेच पूजा-अर्चना टेकाळे महाराज यांनी संपूर्ण आयुष्यभर पार पाडली.त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून ग्रामस्थांनी त्यांना या संस्थानचे मठाधिपती म्हणून अनेक वर्षांपूर्वी घोषित केले होते.मात्र आज आज मंगळवार रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा टेकाळे तसेच बळीराम टेकाळे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून सांप्रदायिक परिवारा मधून तसेच संत महंतांच्या उपस्थित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
Leave a comment