औरंगाबाद । वार्ताहर
9 दिवसांच्या संचारबंदीला आज तिसरा दिवशी 100 % प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व मोठ्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट होता. गस्तीवर असणार्या पोलिस अधिकार्यांच्या गाड्या तेवढ्याच काय ते रस्त्यावर दिसत होत्या. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे विविध भागात अँटीजन टेस्ट घेतली जात आहे. शहरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या तिसर्या दिवशीही शहरातील मुख्य रस्ते वगळता शहरातील अंतर्गत रस्त्यात वाहनेही दिसत नव्हती एकंदरीत संपूर्ण शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोना बाधित रुगणाची संख्या शहरात झपाट्याने वाढत चालली होती.एक प्रकारे कोरोनाने शहरावर कहर केला होता. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक स्वरूपाची संचारबंदी शहरात लागू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक वाहने पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणार्या टवाळखोरांना चांगलाच चाप बसला आहे.त्याचाच परिणाम आज शहरात सर्वत्र शुकशुकाट होता,सर्व रस्ते निर्माणूष्य होते.ठीक ठिकाणी पोलीसाकडून नाकाबंदी, पेट्रोलिंग पाहायला मिळाली तर प्रत्येक वाहन धारकांची चौकशी करूनच पोलीस वाहनांना सोडत होते, तर अनेक दाट वस्त्यांमध्ये नागरिक स्वतःहून घरातून बाहेर पडले नाही.हे देखील प्रशासनाच्या आव्हानाला मिळालेले यशच म्हणावे लागेल.
पोलिस आयुक्तांचा शहरावर वॉच
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद व मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय शहरातील विविध भागात स्वतः जाऊन संचार बंदीची पाहणी करीत आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे क्षेत्रात ते परिस्थिचा आढावा घेताना आयुक्त स्वतः पायी चालत बराच वेळ थांबून नाका बंदीचा आढावा घेतला.
पेट्रोल भरण्यासाठी गर्दी
शहरातील खाजगी पेट्रोलपंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मोजके पेट्रोलपंप सुरू आहेत.अत्यावश्यक सेवा देणार्या डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय, मनपा क्षेत्रातील कर्मचारी पत्रकार यांनाचा पेट्रोल दिले जात आहे. खाजगी पेट्रोल पंप सुरू नसल्याने सकाळी नोकरीवर जाणार्या या अत्यावश्यक सेवामधील कर्मचारी-अधिकारी यांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले
प्रसार माध्यम प्रतिनिधीची दुचाकीच्या पाससाठी अडकून
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने 10 ते 18 जुलैदरम्यान शहरात कडक संचार बंदी ठेवण्यात आली आहेत पोलीस व महानगरपालिक प्रशासन मिळुन शहरात जागो जागी कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहेत या संचार बंदी दोन तासाची दुध विक्री सुट देण्यात आली आहे
या व्यतिरिक्त काही हॉस्पिटल शेजारी मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी जाणार्यामध्ये सुट देण्यात आली आहे माध्यम प्रतिनिधी( पत्रकार, माध्यमचे छायाचित्रकार) यांना सुध्दा सुट देण्यात आली आहे हि सुट असताना सुद्धा माध्यमचे प्रतिनिधी काही ठिकाणी शहरात विविध ठिकाणी जावून पाहणी करून वार्तांकन करण्यासाठी शहरात जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी व महानगरपालिक के चे कर्मचारी यानी दुचाकी वाहनांची पास संदर्भात माध्यम प्रतिनिधीची अडकून करून पासची विचारपूस केली मुळात दुचाकी चालकाला पास ची गरज नाही किंवा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने असे कोणतेही पास दिले नसुन दुचाकी वाहने चालविताना त्याची गरज नाही माध्यम च्या प्रतिनिधी जवळ सदरील माध्यम चे आय कार्ड आहे आय कार्ड दाखविले असते हे चालते नसल्याचे सांगण्यात आले मध्यम च्या प्रतिनिधी पोलीस प्रशासनाने सुरक्षा पास देण्यात आले आहे मात्र त्या सोबत कोणत्याही दुचाकीवर फिरणार्या पास संबंधित खाते देण्यात आले नाही तरी प्रसार माध्यची होणारी अडूनक करणारा कर्मचार्यांना व पोलीस प्रशासनाने योग्य त्या सूचना देण्यात याव्या जसे पोलीस व महानगरपालिक प्रशासन आपले काम चोख बंदोबस्त तैनात ठेवून आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या काम चोक बजावत आहे तसेच आम्ही माध्यम प्रतिनिधी जनतेला योग्य व अचूक माहिती देण्यासाठी फिरत असतो हे महापालिकेने व पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे माध्यमाच्या कर्मचार्यांना त्रास होणार नाही एवढी अपेक्षा आहे.
Leave a comment