अजिंठा । विजय जोशी
अजिंठयात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवार पर्यंत 56 रुग्णसंख्या झाली. येथे 25 बेडचा कोविड सेंटर रुग्णांनी फुल झाला. कोरोना रुग्णांची काय समस्या आहे का? , उपचार बरोबर होते का? जेवणाची व्यवस्था कशी आहेत? काय अडचण आदीची चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, भाजपा तालुकाद्याक्ष ज्ञानेशवर मोठे, गणेश बनकर यांनी अजिंठा कोविड सेंटरला रविवारी भेट दिली.
समस्या बाबत कोरोना रुग्णाची, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज डोंगलीकर यांच्याशी चर्चा केली. सद्या रुग्णालयात जनरेटर, परिचारक ची मोठी समस्या असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज डोंगलीकर यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानावर ही बाब टाकून जिल्ह्याधिकारी मार्फत आम्ही वरील समस्या दोन दिवसांत निकाली काढू असे भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, कृष्णा ढाकरे यांच्याशी ही चर्चा करण्यात आली. यावेळी मेघराज चोंडिये, तारेखख चौउस, शेख मुक्तार, मंगेश स्नानसे, संजीव बिरारे, आदी उपस्थित होते. अजिंठ्यातील मयत झालेले पंचायत समिती सदस्य अली चाऊस यांच्या मुलाला भेट देत सांत्वन करण्यात आले.
प्रतिक्रिया... आम्ही अजिंठा, शिवना कोविड सेंटर भेट देऊन तिथे काय अडचण आहेत. याची माहिती घेत आहोत. जसे अजिंठा कोविड सेंटर ला जनरेटर नाहीत लाईट गेली की रात्री रुग्णांचे हाल होतात. व्हेंटिलेटर नाहीत, परिचारक ही समस्या नोंदवत आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानावर ही बाब टाकून जिल्ह्याधिकारी मार्फत दोन दिवसांत वरील समस्या निकाली काढू.... इद्रिस मुलतानी, प्रदेश चिटणीस, भाजपा
Leave a comment