बोरगांव बाजार । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील बोरगांव वाडी येथे रविवारी कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे,व हा परिसर सिल करण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील बोरगांव वाडी येथे कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्यामुळे संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे व परिसर सिल करण्यात आला आहे,यानतंर पाँझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 16 जणाना होमकाँरन्टाईन्ट मध्ये ठेवण्यात आले, व कोरोना बाधीत रूग्णाला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये पुढील उपचार करण्यासाठी नेण्यात आले आहे,व घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक शिवाजी गायके,व बीट जमादार शेख मुस्ताक,पोलीस कर्मचारी पवार,आरोग्य सेवक राजेद्र उमरिया,पोलिस पाटील नंदु बेडवाल यांनी तो सर्व परिसर कंटेंमेंट झोन म्हणुन जाहीर करून सील केला आहे.
मागील आठवड्यात रत्नागिरीला सहलीसाठी गेला होता व त्यानंतर औरगांबाद येथे बहीणीकडे जाऊन आल्या नतंर त्यांना कोरोना आजाराचे लक्षणे असल्याचे आढळुन आले असता पुढील तपासण्यासाठी आरोग्य कर्मचारी राजेद्र उमरिया यांनी त्यांना आमठाणा आरोग्य केंद्र पाढविले असता तेथील वैद्यकिय आधिकारी योगेश राठोड यांनी संर्दभपञ देऊन पुढील टेस्ट व तपासण्या करण्यासाठी सिल्लोड येथे पाठविलेल्या 35 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे,त्याच्या कुटुंबातील 12 लोकांना व संपर्कात आलेल्या 4 जणाना होमक्वाँरन्टाईन ठेवले आहे,अशी माहिती पोलीस पाटील नंदु बेडवाल यांनी दिली. कोरोना ससंर्गाच्या पाश्वभुमीवर शासन व प्रशासकिय यंञणेकडून लाखो रूपयाचा खर्च करून शहर व ग्रामिण भागात जोरदार उपाय योजना राबविल्या जात असतानाही कोरोना बांधीताचा वाढता आकडा हा नागरीकाच्या वतीने करण्यात येणार्या निष्काळजीपणा, (सोशल डिस्टन्सिग) सामाजिक अतंर न पाळने यामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे,परिसरातील भाजीमंडई, मुख्य बाजारपेठेसह इतर ठिकाणी सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडत असल्याचे दिसुन येत आहे, आता कोरोना मुक्त गाव व परिसर करण्यासाठी नागरीकानी स्वताहुन शासनाने दिलेले निर्देश(आदेश) पाळणे गरजेचे झाले आहे.
Leave a comment