फर्दापूरकरांचे तहसीलदारांना निवेदन
फर्दापूर । वार्ताहर
स्वस्त धान्य दुकानातून मोफत वितरित करण्यात येणार्या तांदूळा ऐवजी गव्हू वितरीत करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदना द्वारे तहसीलदार सोयगाव यांना ग्रा.पं सदस्य शेख इस्माईल शेख ईसा,भाजपा सरचिटणीस हर्षवर्धन जगताप,नारायण कापसे,समद शाह,अंकुश जाधव,मंगला जाधव,शोभाबाई गायकवाड,युवराज जाधव,रिजवान शेख,अमिन खान आदीन सह फर्दापूर (ता.सोयगाव) येथील नागरीकांनी केली आहे.सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोव्हीड 19 विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या संचारबंदी व लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महीन्यापासून शासन शिधापत्रिका धारक पात्र नागरीकांना स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातून दरमहा मोफत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ वितरीत करीत आहे मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आहार पध्दती पाहता येथील लोक सकाळी गव्हाची पोळी किंवा ज्वारी ची भाकरी व रात्रीच्या आहारात तांदूळाचा वापर करतात सध्या किराणा दुकानावर गव्हू 23 रुपये तर ज्वारी 22 रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे मात्र सध्याची परीस्थिती बघता ग्रामीण भागातील गोरगरीब शिधापत्रिका धारकांना किराणा दुकान व खुल्या बाजारातून गव्हू किंवा ज्वारी विकत घेणे शक्य नाही दरम्यान कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परीस्थितीचा विचार करुन प्रशासनाने स्वस्तधान्य दुकानातून दरमहा मोफत वितरीत करण्यात येणार्या तांदुळा ऐवजी प्रति व्यक्ती 5 किलो गव्हू वितरीत करुन ग्रामीण भागातील नागरीकांना दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदना द्वारे तहसीलदार सोयगाव यांना फर्दापूर येथील शिधापत्रिका धारक पात्र नागरीकांनी केली असून या निवेदनाच्या प्रति ग्रामपंचायत कार्यालय फर्दापूर व ग्राम दक्षता समिती अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहे.दरम्यान शिधापत्रिका धारकाच्या या मागणी वर महसूल व पूरवठा विभाग काय भूमिका घेते या कडे फर्दापूरकरांचे लक्ष लागून राहीले असल्याचे दिसून येत आहे.
Leave a comment