सोयगाव । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची आकडेवारी वाढत असल्याचा धसका प्रशासनाने घेतला असून जरंडी,निंबायती भागात कोविड केंद्राच्या पूर्वतयारी आणि पाहणीसाठी उपविभागीय धिकारी ब्रजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे यांचे पथक शनिवारी सुटीच्या दिवशीही असून नागरिकांशी संपर्क साधत होते.दरम्यान जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि निंबायती तालीमुल मदरसा उर्दू शाळेत नव्याने कोविड केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या कोविड केंद्राच्या पूर्वतयारीसाठी चक्क महसूल आणि आरोग्याचे पथके सुटीच्या दिवशीही आढळून आली होती.
निंबायती तालीमुल मदरसा उर्दू शाळेत नव्याने शंभर खाटांचे नवीन कोविड केंद्र तयार करण्यात आले आहे.त्यासाठी लागणारी साहित्य आणि इतर आरोग्य विषयक सोयींचा पुरवठा करण्यासाठी शनिवारी महसूल आणि आरोग्याच्या पथकांनी पाहणी करून सुविधा उपलब्ध करून दिल्या.जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केंद्रातील गैरसोयी तातडीने दूर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास डोंवाने यांना दिल्या आहे.जरंडी आणि निंबायतीला तब्बल 150 खाटांचे दोन भव्य कोविड केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.या परिसराला सुशोभित करून सफाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार मकसूद शेख,सतीश देशमुख,ग्रामसेवक वसंत पवार,बद्री राठोड,शमा तडवी,अन्वर तडवी,तोसीफ शेख,अनिल पवार,आबासाहेब शिंदे,आदींची उपस्थिती होती.
जरंडी,निंबायतीला 150 खाटा उपलब्ध-ब्रजेश पाटील यांची माहिती
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड काळजी केंद्र आणि निंबायती मदरसा येथील कोविड केंद्राला तब्बल 150 खाटा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी दिली असून सायंकाळी उशिरा निंबायती ता.सोयगाव येथे शंभर खाटा उपलब्ध झाल्या असून जरंडीला 50 खाटा पुरविण्यात आल्या आहे.
Leave a comment