जालना । वार्ताहर
दि.10 जुलै 2020 रोजी पोखरी सिंदखेड ता.जि.जालना येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेती शाळा घेण्यात आली. यामध्ये उपस्थित शेतकरी वर्ग व महिला शेतकरी यांना शेतीशाळा प्रशिक्षक रघुनाथ गोरे यांनी लिंबोळी अर्क तयार करणे, कामगंध सापळे लावणे यांचे महत्त्व पटवून दिले. कृषी सहाय्यक सावळे मॅडम व समूह सहायक तुषार कोकणे यांनी पोखरा मधील विविध योजना विषयी व यांत्रिकीकरणाविषयी माहिती दिली. यावेळी सरपंच, कृषी ताई, महिला शेतकरी व इतर शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment