दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 301 जणांना (मनपा 132, ग्रामीण 169) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 4463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 277 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 224, ग्रामीण 53) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7949 झाली आहे. आजपर्यंत एकूण 342 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3144 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 94 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 65 रुग्ण अँटीजन टेस्ट तपासणी द्वारे पाँजेटीव्ह आढळून आले आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (67)
नागेश्वरवाडी (10), निराला बाजार (1), नक्षत्रवाडी (9), एन अकरा, सिडको (1), हर्सूल कारागृह परिसर (2), चेतना नगर (1), मुकुंदवाडी (1), हर्सुल कारागृह क्वार्टर परिसर (19), एकनाथ नगर (5), विशाल नगर (5),एन चार सिडको (3), विठ्ठल नगर (2) गांधी नगर (8),
चेक पॉइंटवरील रुग्ण (16)
दौलताबाद टी पॉइंट (2), झाल्टा फाटा (8), नगर नाका (2), चिकलठाणा (1), हर्सुल टी पॉइंट (3)
ग्रामीण रुग्ण : (11)
विहामांडवा, पैठण (1), वाळूज, गंगापूर (3) शिवाजी नगर, सिल्लोड (2), सहारा सिटी, सिल्लोड (5) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीमध्ये बीड बायपास रोड, सातारा येथील 65 आणि एका खासगी रुग्णालयात एन अकरा, मयूर नगर, हडकोतील 78 पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment