औरंगाबाद । वार्ताहर

कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने  रुग्णाचे  निदान लवकर होण्यासाठी आता अ‍ॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आज शहरातील विविध ठिकाणी एकूण 1851 जणांचे स्वॅब घेण्यात आले.त्यापैकी 65 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची  अ‍ॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे.यामध्ये हर्सुल जेल क्वार्टर येथे 234 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यापैकी 19 पॉझिटिव्ह आले तर एकनाथ नगर येथे 73 पैकी पाच पॉझिटिव्ह, विशाल नगरमध्ये  111 पैकी पाच पॉझिटिव्ह,एन-फोर येथील 102 पैकी तीन पॉझिटिव्ह, विठ्ठल नगरमध्ये 64 पैकी एक पॉझिटिव्ह तर गांधी नगरमध्ये 117 पैकी आठ,  नक्षत्र वाडीत 100 पैकी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.तर वसंत विहार मध्ये 222 तपासणी केली आणि  कामगार नगरमध्ये पन्नास जणांची तपासणी केली मात्र या दोन्ही ठिकाणी एक ही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

या ठिकाणांसह शहरातील चेक पॉइंटवरही अ‍ॅण्टीजन टेस्ट करण्यात आली.यामध्ये दौलताबाद टि पॉइंटवर 61 जणांचे  स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले तर झाल्टा फाटा येथे 197 पैकी आठ, नगरनाका येथे 177 पैकी दोन, चिकलठाणा येथे 170 पैकी एक,हर्सुल टि पॉइंट येथे 118 पैकी तीन जणांचे अहवाल  पॉझिटिव्ह आले . तर कांचनवाडी चेक पॉइंटवरील तपासणी केलेल्या 55 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. या विविध ठिकाणी एकूण 1851जणांचे स्वॅब तपासण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.