महत्वाची बाजार पेठसह शहरात सर्वत्र शुकशुकाट
औरंगाबाद । उमेश पठाडे
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून संपूर्ण शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 10 ते 18 जुलै दरम्यान कडक संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात मेडिकल वगळता इतर कोणत्याही कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदीच्या धास्तीने औरंगाबाद शहरातील व परिसरातील नागरिक घरातच आपला वेळ घालवत प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणार्या गुलमंडी, शहागंज, मोंढा नाका, औरंगपुरा, सिडको आदी भागात आज कडक बंद पाळण्यात आला आहे.
Leave a comment