सिल्लोड-प्रतिनिधी
येथील इंद्रराज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले सहा.प्रा. चंद्रशेखर गोरखनाथ देवकाते यांना नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अंतर्गत रसायनशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही पदवी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यावतीने घोषित करण्यात आली आहे. प्रा. चंद्रशेखर देवकाते यांनी एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिंथेसिस ऑफ बायो ऍक्टिव्ह कंपाऊंड या विषयावरील शोध प्रबंध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना सादर केलेला होता.
सदरील संशोधनाचे कार्य त्यांनी औरंगाबाद येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. यासोबतच डॉ.मोहंमद सिद्धिकी, शासकीय विज्ञान संस्था नागपूर यांचे त्यांना सह संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. मोहंमद सिद्दिकी, त्यांची आई गीताबाई देवकाते तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार उत्तमसिंह पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य पी.पी .शर्मा,उपप्राचार्य व्ही .बी. लांब,डॉ. सी.एम. काळे, आयक्युएसी समन्वयक डॉ. संतोष चौथाईवाले, कार्यालय अधीक्षक श्री. किरण राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave a comment