बोरगाव बाजार । वार्ताहर
बोरगांव सारवाणा ता.सिल्लोड येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक 11 ते 18 या काळात गावात पुर्ण संचार बंदी लावण्याचा निर्णय ग्रामसभेच्या बैठकितुन घेतला. जगात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न चालु आहेत.
या कोरोना संसर्गचा शहरी व ग्रामीण भागात हि शिरकाव केला आहे व हि ससंर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाकडुन शर्तीचे प्रयत्न चालु आहे, याच आनुषगांने बोरगांव सारवाणी ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक 10 रोज शुक्रवारला पदाधिकारी व गावकर्यांमध्ये बैठक बोलवुन दिनांक 11 ते 18 जुलै 2020 या कालावधीमध्ये गावात संध्याकाळी 5 वाजेपासुन ते दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यत या काळात दवाखाने, मेडीकल या अत्यआवश्यक सेवा वगळता सर्व किराणा दुकान,हाँटेल, केशकर्तनालय दुकान,सह सर्व व्यवहार पुर्ण बंद राहतील असा ठरावच ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे, या लाँगडाऊन काळात बिनकामाने घराबाहेर पडु नाही,लाँगडाऊनचे सक्तीने पालन करावे,मास्क, हँन्डवाँशचा नियमित वापर करावा, व गावात कोणीही रिकामे फिरता कामानाही नाही, प्रशासनाला मदत करावी,नसता पोलीसात गुन्हा नोद करण्यात येईल,ग्रामपंचायतीने अशा आशयाचे पञक काढुन गावातील सर्व व्यवसायिकांना वाटप करण्यात आले, याच बरोबर प्रशासनाला सहकार्य करावे असे अवाहन देखील यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडुन करण्यात आले.
Leave a comment