वैजापूर । वार्ताहर
वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी व कृषी सप्ताहानिमित्त वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात पोकरा समितीची मीटिंग घेऊन झालेल्या कामाची माहिती कृषी सहाय्यक डी.एस.कुचेकर यांनी दिली. यानंतर कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी व मका पिकावरील लष्करी अळी या विषयी माहिती सांगण्यात आली. यानंतर लाभ दिलेल्या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पोकरा समितीने शेतकर्यांकडून माहिती जाणून घेतली.
महिला बचत गटाची बैठक घेऊन सरपंच अनिता त्रिभुवन यांनी महिला बचत गटाच्या योजनांची माहिती महिलांना सांगितली व जास्तीत जास्त महिला बचत गट तयार करण्याचे आवाहन त्यांनी गावातील महिलांना केले.गावात झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी समितीतर्फे करण्यात आली. नंतर समितीचे अध्यक्ष व समितीचे सदस्य आणि पोकरा शेतकरी शेतीशाळा भेट देऊन श्रीकांत मोईन यांच्याकडुन शेती शाळेची माहिती जाणून घेतली.यावेळी गावातील सर्व विहिरी पुनर्भरण करण्यासाठी शिवार फेरी करून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपसरपंच रविंद्र मोईन यांनी गावात झालेल्या पोकरा कामाची माहिती सांगितली.जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती केली. यावेळी कृषी सहाय्यक डी.एस.कुचेकर समूह सहाय्यक स्वप्निल खैरणार, ग्रामसेवक कचरे ए. पी., पोकरा समितीचे अध्यक्ष सरपंच अनिता त्रिभुवन, उपसरपंच रविंद्र मोईन, सदस्य गुलाब मोईन, राजेंद्र अंभोरे, कृषी ताई सुनिता अंभोरे, अलका साळुंके, शेतकरी मच्छिद्र त्रिभुवन, साहेबराव मोईन, श्रीकांत मोईन, दिपक मोईन, अशोक त्रिभुवन ,बाळू पानसरे, योगेश पवार यांच्यासह महिला व शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment