सोयगांव । वार्ताहर
शासनाने फळपिक विमा योजनेतून सिताफळ वगळले आहे.सिताफळ हे फळ असून देखील विमाकवच मिळत नसल्याने सिताफळ उत्पादक शेतकरी नाराज झाले असून सोयगांव येथील शेतकर्यांनी सिताफळाचा फळपिक विमा योजनेत समावेश करण्याबाबत कृषि विभागाला निवेदन दिले आहे.
सोयगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिताफळ लागवड झालेली आहे.काहीं शेतकर्यांनी वीस वर्षापूर्वी सिताफळ लागवड केली.आहे त्यांनंतर दरवर्षी शेतकरी सिताफळ लागवड करीत आहे.कमी पाण्यात, कमी खर्चात व हलक्या जमिनीत येणार्या सिताफळ लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहे.परंतु फळधारणा होत असतांना पाऊस न पडल्यास किंवा विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास नुकसान होऊन आर्थिक फटका बसतो अशा वेळी विमाकवच असल्यास शेतकर्यांना दिलासा मिळतो परंतु इतर पिकांप्रमाणे शासनाने सिताफळाला पिकविमा योजनेत समाविष्ट केले नाही.त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे.सिताफळाचा विमा योजनेत समावेश करावा या मागणीचे निवेदन सोयगाव येथील शेतकरी अरुण सोहनी, विनोद सोहनी, गणेश आगे, सुनिल रोकडे, डॉ.ज्ञानेद्र पायघन, राजू दुतोंडे, भास्कर चौधरी यांनी तालुका कृषि कार्यलयात दिले विभागाचे दिपक पाटील , देशपांडे, विनोद कायस्थ यांनी हे निवेदन स्वीकारले.
Leave a comment