औरंगाबाद । वार्ताहर
दुरदर्शन केंद्रात सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्याचे घर फोडून चोरांनी सोन्याचे दागिने आणि 60 हजारांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दिड वषार्नंतर दोघांना अटक केली आहे. संतोष उर्फ मुकेश उर्फ बांग्या गणेश रामफळे (रा. टाऊन हॉल) आणि प्रशांत कचरु ठोंबरे (रा. राधास्वामी कॉलनी, हर्सुल) अशी अट्टल घरफोड्यांची नावे आहेत.
सूरतच्या दुरदर्शन केंद्रात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप मोहरीर (रा. सुराणानगर) यांच्या पत्नी ज्योती व मुलगी अर्पिता अशा दोघी 27 जानेवारी 2019 रोजी व्यंकटेशनगरात दुपारी खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी अवघ्या तीन तासात त्यांचे घर फोडून चोरांनी कपाटातील सोन्याचे वीस तोळ्यांचे दागिने आणि साठ हजारांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 6 जुलै रोजी रामफळे आणि ठोंबरे हे टाऊन हॉल येथील जयभीमनगरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन उपनिरीक्षक विजय जाधव, नरसिंग पोमनाळकर, सहायक फौजदार नजीर पठाण, जमादार श्रीराम राठोड, रमेश भालेराव, परभत म्हस्के, विकास माताडे, अश्वलिंग होनराव, माधव चौरे, संदीप बीडकर, नितीन धुळे, शिवाजी भोसले, सरीता भोपळे, संजीवनी शिंदे, शेख बाबर आणि ज्ञानेश्वर पवार यांनी दोघांना पकडले. दरम्यान, प्रशांत ठोंबरे आणि बांग्या रामफळे यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्या होत्या. तेव्हापासून रामफळे हा पसार होता. तर ठोंबरेला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment