विहामांडवा । वार्ताहर
पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोणा या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असुन विहांमाडवा येथील दि.6 (सोमवारी) कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दि.7. (मंगळवारी) रात्री त्या रुग्नाचा उपचार घेत असतांना मृत्यु झाला.
स्थानिक सह तालुका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात धावपळ करत या रूग्णाच्या निकट संपर्कातील जवळपास सोळा जनांचे स्वँब नमुने घेऊन तपासणी साठी औरंगाबादला पाठवले होते. त्यातील 42 वर्षिय चिंचाळा तालुका पैठण येथील व्यक्तीस कोरोणा संसर्ग झाल्याचा अहवाल दि.7 मंगळवारी प्राप्त होताच त्या व्यक्तीला पाचोड (ता.पैठण) येथे ट्रामा केअर सेंटरला उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. यातील पंधरा लोकांना आता होम काँरंटाईन करण्यात आले. असुन नव्याने बाधीत रुग्णाच्या निकटसंपर्कातील अकरा लोकांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले. सदरील व्यक्तीचे नातेवाईकांचे स्वाब घेतल्या जाणार असल्याची माहिती येथिल वैद्यकिय अधिकारी यादव सोनकांबळे व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
Leave a comment