वैजापूर । वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर आपत्कालीन उपाययोजना म्हणून लोणी खुर्द येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यातील नागरिकांची कोरोना संसर्गाची आरोग्य तपासणी घरोघरी जाऊन सुरू करण्याचा संकल्प तहसीलदार निखिल धुळधर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नोडल अधिकार्यांच्या निगराणीखाली गावातील शिक्षक, शिक्षिका, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक यांच्याद्वारे गावातील प्रत्येक नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून त्या व्यक्तीचे आव्हाल तयार ठेवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.
या तपासणी सप्ताहामध्ये ताप, पल्स रेट, रक्तातील ऑक्सिजन लेव्हल, यांची तपासणी करून गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. या तपासणी मोहिमेमूळे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची तपासणी करणे व त्यावर वेळीच उपाययोजना करणे सोपे जाणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात तपासणी मोहीम करणे आवश्यक असल्याचे मत गावातील सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवले आहे. याकामी केंद्र प्रमुख सुनिल गंगवाल , सहशिक्षक पि.एस.निकम,शालेय समिती अध्यक्ष सादिक सैयद , राजेंद्र जगदाळे, आशा कार्यकर्ती सविता पवार, जोती जाधव ,पठारे सर यांच्यासह शिक्षक मंडळी परिश्रम घेत आहे.
Leave a comment