औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 129 जणांना (मनपा 85, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4162 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 334 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 204, ग्रामीण 130) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7672 एवढी झाली आहे. आजपर्यंत 338 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3172 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 26 रुग्णांची (11 पुरूष, 15 महिला) वाढ झाली आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (15)
पद्मपुरा (13), बीड बायपास (2), औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (101)
कांचनवाडी (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी एन सहा (1), जटवाडा रोड (1), जयसिंगपुरा (2), राम नगर (1), बालाजी नगर (1), शुभमंगल विहार (1), विशाल नगर (2), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (2), स्वामी विवेकानंद नगर (4), रमा नगर (9), विठ्ठल नगर (3), रेणुका नगर (3), अमृतसाई प्लाजा (2), जय भवानी नगर (1), एन बारा हडको (1), पवन नगर (1), किर्ती सो., (3), रायगड नगर (9), मिसारवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), सातारा परिसर (2), गजानन कॉलनी (1), चिकलठाणा (1), एन अकरा, सिडको (1), मुकुंदवाडी (1), संजय नगर (1), अजब नगर (6), गजानन नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भक्ती नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), हनुमान नगर (1), अरिहंत नगर (3), बंजारा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (3), पुंडलिक नगर (1), खोकडपुरा (7), नारेगाव (2), सेव्हन हिल (1), टाईम्स कॉलनी (1), राम नगर (1), जाधववाडी (1), विजय नगर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1)
ग्रामीण रुग्ण :(65)
कन्नड (1), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (1), अजिंठा (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (6), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (4), गणेश सो., बजाज नगर (1), जगदंबा सो., वडगाव (1), सिडको वाळूज महानगर एक (2), फुले नगर, पंढरपूर (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (2), संगम नगर, बजाज नगर (5), वडगाव, बजाज नगर (2), वळदगाव, बजाज नगर (2), नंदनवन सो., बजाज नगर (2), सारा किर्ती, बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (2), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (1), वंजारवाडी (8), शिवशंभो सो., बजाज नगर (1), सावता नगर, रांजणगाव (1), हतनूर, कन्नड (1), नागापूर, कन्नड (1), कारडी मोहल्ला, पैठण (3), कुंभारवाडा, पैठण (8) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
घाटीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आठ जुलै रोजी पैठण तालुक्यातील कराडी मोहल्ला येथील 56 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील गणेश कॉलनीतील गल्ली क्रमांक चारमधील 80 वर्षीय स्त्री, 9 जुलै रोजी सिल्लेखाना येथील 42 वर्षीय पुरूष, अरिश कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष आणि कन्नड तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 262 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 254 औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. आतापर्यंत घाटीत 254, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 335 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Leave a comment