सिल्लोड । वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने व नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच युवानेते अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरात पुन्हा निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरात हायपोक्लोराइड व धूर फवारणी करण्यात येत आहे. शहरातील मानेवाडी भागात या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी नगरसेवक सुनील दुधे, सुधाकर पाटील, रतनकुमार डोभाळ ,कुणाल सहारे, मोईन पठाण आदी दिसत आहेत.
Leave a comment