नागरिकांनी सावधगिरी बाळगावी प्रशासनाचे अवाहन
पैठण । नंदकिशोर मगरे
पैठण शहरात दिवसेन दिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून पहिल्यांच शहरात एकाच दिवशी 11 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने एकून संख्या अर्धशतक पार करून 59 वर पोहचली आहे .तर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाच्या वतिने अवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवडाभरा पासून कोरोना साथीच्या रोगान थैमान घातल असून शहरासह ग्रामीण भागातही या अजाराचा फैलाव सुरू असून प्रशासनापुढं मोठा पेच निर्माण झाला आहे .कोरोना बाधितांची साखळी तोडावी कशी याकडे आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा लक्ष देवून आहे 7 तारखे पर्यंत एकूण 48 चाळीस बाधितांची संख्या होती त्यातच दि 9 रोजी 11 जनांची भर पडल्याने हि संख्या 59 वर येवून ठेपली असल्याने शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे त्यातच अता पर्यत बाधीत चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन महिला व दोन पुरूषांचा सामावेश आहे.
तर दारू सलाम मोहल्ल्यात नागरिकांनी स्वता पुढाकार घेवून अँटीजेन रँपीड टेस्ट करा अशी मागणी केली असता आरोग्य विभागाने तब्बल 24 जनांची टेस्ट केली त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बहुतांशी नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे ,तहसिलदार चंद्रकांत शेळके, शासकीय रूग्णालयाचे प्रपाठक ऋषीकेश खाडीकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय वाघ, डॉ निलेश पाटील ,डॉ संदिप रगडे , मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदिंची उपस्थिती होती
Leave a comment