औरंगाबाद । वार्ताहर

सतत 103 वर्षांपासून 210 देशात निरलसपणे सामाजिक सेवा बजावणार्‍या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या बहुप्रांतीय परिषदेतर्फे अ‍ॅड.शांतीलाल छापरवाल नागदकर यांना सर्वोकृष्ट प्रसिध्दी प्रमुख म्हणून दहाव्यांदा बहुप्रांतीय अध्यक्ष सुनिल व्होरा, माजी बहुप्रांतीय अध्यक्ष संदिप मालू, इंटरनॅशनल संचालक डॉ.नवल मालू यांच्यातर्फे चार्टर प्रांतपाल तनसुखजी झांबड यांनी सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. हा बहुमान सलग दहा वेळा मिळविणारे अ‍ॅड.शांतीलाल छापरवाल हे एकमेव प्रसिध्दी प्रमुख आहेत. 

हा पुरस्कार मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यांच्या या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय संचालक डॉ.नवल मालू, पूर्व आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, राजू मनवाणी, माजी बहुप्रांतीय अध्यक्ष संदिप मालू, बहुप्रांतीय अध्यक्ष सुनिल व्होरा, सचिव डॉ.संजय व्होरा, बहुप्रांतीय अध्यक्ष गिरीष मालपाणी, माजी प्रांतपाल महावीर पाटणी, तनसुख झांबड, राजेश राऊत, नितीन बंग, प्रांतपाल विवेक अभ्यंकर, उपप्रांतपाल दिलीप मोदी, पुरूषोत्तम जयपुरिया, सचिव राहुल औसेकर, लायन पारस ओसवाल, राजेश भारूका, राजेश जाधव, दिनेश पाटील, दत्तात्रय देशपांडे, अशोक जगधणे, वाळूज क्लब अध्यक्ष अशोक गुरनाळे, राजेंद्र रखवाल, जितेंद्र महाजन, संजय कांकरिया, अनिल अग्रहारकर, जयराज पाटील, संतोष काथार, प्रदिप देशपांडे, नंदकुमार तावडे, दयाल डोंगरे, शशांक तोलवाणी, राजाराम जाधव, संतोष कावळे पाटील, माधव सूर्यवंशी, रूपचंद्र अग्रवाल, अशोक भालेकर, मनोज पाटणी, संतोष लेणेकर आदि मान्यवर व सर्व औरंगाबाद लायन्स परिवाराने अ‍ॅड.शांतीलाल छापरवाल नागदकर यांचे या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे. अशी माहिती ला.मनोज पाटणी यांनी पत्रकाद्वारे दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.