सिल्लोड । वार्ताहर
सिल्लोड तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारणीची निवड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे यांनी नुकतीच जाहीर केली. या निवडीमध्ये सिल्लोड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदी येथील साईराज प्रतिष्ठानचे कमलेश कटारिया यांची निवड करण्यात आली.
कमलेश कटारिया हे दोन वेळेस नगरसेवक पदी राहिलेले असून त्यांनी साईराज प्रतिष्टान च्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम दिले असून अर्बन बँक च्या द्वारे होतकरू युवकांना रोजगारासाठी सहकार्य केलेले असून राजकिय कारकीर्द सुद्धा चांगली आहे. त्यांच्या या सर्व कामाची पावती व पक्षाची निष्ठा बघून त्यांची शहर अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Leave a comment