औरंगाबाद । वार्ताहर

समाजाला पाठिंबा म्हणून कोविड- 19 चे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना साह्य करत बायर संसर्गित रूग्णांचा उपचार करण्यासाठी चित्तेगाव येथे 100 बेडचे कोरोना केअर केंद्र उभारत महाराष्ट्र सरकारला साह्य करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बायर कोविड-19 विरोधातील लढ्यामध्ये महाराष्ट्र सरकार, स्थानिक अधिकारी आणि इतर संस्थांसोबत सहयोग जोडत आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 आजाराने सर्वाधिक थैमान घातले आहे आणि सध्या भारताच्या एकूण संसर्गित रूग्णांच्या केसेसपैकी एक-तृतीयांश केसेस महाराष्ट्रामध्ये आहेत. या आव्हानात्मक काळामध्ये बायर विविध समुदाय व प्रशासनांना व्यापक पाठिंबा देत आली आहे आणि मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देखील योगदान दिले आहे. चित्तेगाव येथील 4,500 चौरस फूट जागेवरील हे केंद्र कोविड-19 संसर्गित रूग्णांचा उपचार करण्यासाठी 100 बेड्सची भर करत प्रशासनाच्या पायाभूत सुविधांना साह्य करेल. बायरच्या क्रॉप सायन्स डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सायमन विबुश म्हणाले, ‘बायरमध्ये आमचा’सर्वांसाठी उत्तम आरोग्य, कोणीही उपाशी राहणार नाही’(हेल्थ फॉर ऑल, हंगरफॉर नन) हा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन आमच्या भविष्यासाठी पाया उभारतो आणि आम्ही संस्थेमध्ये घेत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात महत्त्वाचा आहे. आम्ही या अवघड काळामध्ये प्रशासनाला पाठिंबा देण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे स्वत:ला भाग्यवान व विनम्र मानतो.’’

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले,’’महामारीचा आपणा सर्वांना संसर्ग होण्याची भिती असलेल्या सध्याच्या स्थितीमध्ये आपण या आव्हानांवर मात करण्यासाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. बायरने हे कोरोना केअर केंद्र उभारण्यासाठी त्यांचा प्लाण्ट सुरू करण्याकरिता महाराष्ट्र सरकार त्यांचे आभार मानते. हे केंद्र स्थानिक समुदायांना दीर्घकाळापर्यंत साह्य करेल.’’ या महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करणे आवश्यक आहे आणि बायरमध्ये आम्ही विविध समुदायांशी सहयोग जोडण्यास व त्यांना पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहोत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.