वैजापूर । वार्ताहर
शहरातील इंदिरानगर परिसरातील ‘त्या’ 60 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा 7 जूलै रोजी मृत्यू झाला. शहरात कोरोनाचा हा पहिलाच बळी असून तालुक्यातील कोरोना बळींची संख्या पाच झाली आहे. दरम्यान शहरातील दर्गावेस परिसरात कोरोनाचे पुन्हा तीन बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 108 झाली आहे.
शहरातील इंदिरानगर परिसरात 5 जूलै रोजी 60 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिलेच्या संपर्कात आलेल्या याच परिसरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये दोन , पाच व नऊ वर्षीय असे तीन मुले, पंधरा व वीस वर्षीय दोन मुली अशा एकूण पाच जणांचा समावेश आहे. जिथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तो परिसर नगरपालिकेने प्रतिबंधित केला आहे. दरम्यान इंदिरानगर परिसरातील त्या महिलेचा 7 जूलै रोजी मृत्यू झाला आहे. यापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे चार बळी गेले. आता हा पाचवा बळी असून शहरातील माञ पहिलाच बळी आहे. शहरात पहिला बळी गेल्याने शहरवासियांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. शहरात कोरोनाचा एक बळी तर गेलाच. परंतु दुसरीकडे शहरातील दर्गावेस परिसरात तीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका दांपत्यासह अन्य एका महिलेचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर परिसरात कोरोना बाधित रुग्णसंख्या एकूण सहा तर दर्गावेस परिसरातील रुग्णसंख्या 64 झाली आहे. तसेच तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 108 झाली आहे.
Leave a comment