जिल्ह्यात 4033 कोरोनामुक्त, 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 209 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 4033 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 134 तर ग्रामीण भागातील 75 जणांचा समावेश आहे. आज एकूण 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7338 एवढी झाली आहे. आजपर्यंत 330 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 2975 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 204 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 122 तर ग्रामीण भागातील 82 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सायंकाळनंतर वाढलेल्या रुग्णांमध्ये 20 पुरूष आणि 16 महिला रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (22)
कासलीवाल मार्बल (1), नक्षत्रवाडी (5), बारूदगर नाला (1), मनपा परिसर (1), कांचनवाडी (14)
ग्रामीण रुग्ण : (14)
हतनूर, कन्नड (3) कन्नड बाजारपेठ (1), खांडसरी, कन्नड (2), अंधानेर, कन्नड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (2), समता नगर, सिल्लोड (1), शिवना, सिल्लोड (1), हनुमान नगर, अजिंठा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात पडेगावातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 249, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 79, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 330 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
Leave a comment