वनमंत्र्याना दिले निवेदन
फर्दापूर । वार्ताहर
अजिंठा वनपरीक्षेत्राअंतर्गत करण्यात आलेल्या कामात बोगस मजुर दाखवून जवळपास दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन देवीदास जगताप यांनी केला असून या संपूर्ण प्रकाराच्या चौकशी ची मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली आहे. हर्षवर्धन जगताप यांनी सदरील निवेदनात नमूद केले आहे की अजिंठा वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणार्या राखीव जंगलात सन 2017 पासून 2020 पर्यंत वृक्ष लागवड,गुरे प्रतिबंधक चर मारणे, शेत तळे माती नाला अशी अनेक कामे अत्यंत थातूर मातूर पध्दतीने मशीनच्या साहाय्याने करण्यात आली असतांना ही कामे मजुरांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे दाखवून वनपरीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यांनी बोगस मजुरांच्या नावे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की बोगस मजुरांच्या नावावर लाखो रुपयांची उचल करण्यात आलेल्या कामान पैकी एकही काम अंदाजपत्रका नुसार करण्यात आलेले नसून यातील काही कामे तर प्रत्यक्षात झालेलीच नाही दरम्यान कामे झालेली नसतांनाही कामे पूर्ण झाली असल्याची दाखवून बोगस मजुरांच्या नावे वनपरीक्षेत्रात जवळपास दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचेही हर्षवर्धन जगताप यांनी म्हटले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदना द्वारे केली असून या निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी सिल्लोड व वनपरीक्षेत्र अधिकारी अजिंठा यांना देण्यात आल्या आहे.
Leave a comment