औरंगाबाद । वार्ताहर
रेल्वे स्टेशन येथे क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य कुणाल मराठे यांनी मागील अनेक दिवसांपासून सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न रेल्वे प्रबंधक यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
याबाबत त्यांना निवेदन देत सफाई कामगारांना मास्क, सॅनिटाइझर देण्यात यावे, सफाई कामगारांचा पीएफचा प्रश्न रखडला असून तो लवकरात लवकर मार्गी लागावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य कुणाल मराठे यांनी दिला आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून कामगारांना पगार नसल्याने त्यांची दैनी अवस्था झाली आहे. त्यामुळे तो देण्यात यावा, अशी मागणी मराठे यांनी यावेळी केली. संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातले असून त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत देखील सफाई कामगार नियमितपणे त्याची सफाई करण्याची सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असे मत कुणाल मराठे यांनी व्यक्त केले.
Leave a comment