औरंगाबाद । वार्ताहर
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी व वाळूज परिसरात घरातून मोबाईल चोरणार्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. शुभम झा (वय 23 रा. दत्तनगर, रांजणगाव शेनपुंजी) व सन्नी कोलथे (वय 19 रा. बेगमपुरा, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम पवार यांनी 14 जून रोजी वाळूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या घरात चार्जिंगला लावलेले मोबाईल कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी चोरून नेले आहेत.
त्यानुसार शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, रांजणगाव फाटा येथे एक व्यक्ती जुने मोबाईल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की, 15 दिवसांपूर्वी त्याने व त्याचा साथीदार सनी यांनी चार मोबाईल चोरले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
Leave a comment