पाचोड । वार्ताहर
परिसरातील बहुतांश भागात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच हरणे देखील पिकांची नासाडी करू लागल्याने शेतकर्या मोठ्या अडचणीत पडला आहे.ऊस ,भुईमूग, मका,कपासी यांच्यासह विविध चारा पिकांची रानडुकरे रात्रीतून मोठ्या नुकसान करीत आहे. यामुळे शेतकर्यांनी मोठ्या उपाययोजना केल्या असल्या तरी हजारो रुपयाचे नुकसान शेतकर्यांचे दररोज होताना दिसून येत आहे.
जंगलाचे क्षेत्र सातत्याने घटत चालल्याने वन्यप्राणी मानवी वस्त्यांचा आश्रय घेत आहेत. हे प्राणी पाणी व चार्याच्या शोधात सातत्याने फिरतात. या यांचे कळप शेतकर्यांसाठी मोठी डोकेदुखी बनत आहे.सकाळपासून रात्रीपर्यंतही शेतकर्यांना राखणीसाठी शेतातच थांबावे लागत आहे. परिसरातील सर्वच ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती असल्याने शेतकर्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. हरणांच्या व रानडुकाराःच्या उपद्रवाने डोकेदुखी वाढली आहे. पैठण तालुक्यात यंदा सुरूवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.परंतु पाचोड परिसरातील थेरगाव येथील संजय भुसारे यांच्या शेतामध्ये गट नबंर 137 मध्ये उस लावलेला असून या रानडुकराचा मोठ्या पिकांची नासाडी केली आहे,या बाबतीत वन विभागाकडून बंदोबस्त करावा याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अनेक उपयोजना करून देखील रानडुकर व हरणे रात्री शेतातमध्ये येऊन मालांची मोठ्या प्रमाणे नासाडी करत आहे. यामुळे हाताशी आलेला घास या वन जनावरांमुळे हिरावून घेतला जात आहे. यामुळे शेतकर्यांना काही पिकांची नव्याने पेरणी करावी लागत आहे. या परिसरात रान डुकराचे आणि हरणानी अक्षरश धुमाकूळ घातला आहे.यामुळे वन विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करावे तसेच झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
तक्रारी करणे सोडले..!
या बाबत वनविभागाला या अगोदर च्या नुकसानी विषयी तक्रारी करण्यात आले होत्या परंतु वनविभागाकडून मोबदला कमी आणी कार्यलयात चक्कर जास्त मारावे लागत असल्यामुळे भेटलेला मोबदला हा ये-जा करण्यासाठी जातो आणि मोबदला ही कमी प्रमाणात दिला जातो त्यामुळे तक्रारी करणे सोडले आहे.
संजय भुसारे-शेतकरी थेरगाव.
Leave a comment