औरंगाबाद  । वार्ताहर

कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असं या नगरसेवकांचं नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यानच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

( फोटो प्रतिकात्मक )
रावसाहेब आमले या नगरसेवकांवर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह शिवसेना पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची भावना अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.नितीन साळवे यांच्यावर मागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डतून निवडून आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर मंगळवारी (7 जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, औरंगाबादेत आज 166 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासह औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 300 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये उपचारानंतर 3 हजार 824 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 149 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 1003 स्वॅबपैकी आज 166 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (99)
हर्सुल जटवाडा रोड (1), मिल कॉर्नर (1), एन अकरा, हडको (5), सिडको (1), अमृतसाई प्लाजा (21), भगतसिंग नगर (1), एन सहा सिडको (1), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (1), एकनाथ नगर (1), शहागंज (1), शिवाजी नगर (2), कटकट गेट (1), वसंत विहार (1), हुसेन कॉलनी (1), मारोती नगर (2), देवळाई (1), सातारागाव (1), चिकलठाणा (2), नंदनवन कॉलनी (1), राजेसंभाजी नगर (3), स्वराज नगर (1), उस्मानपुरा (1), जवाहर कॉलनी (1), पिसादेवी (1), समर्थ नगर (1), एन सात, आयोध्या नगर (1), हर्सुल (1), खोकडपुरा (3), पैठण गेट (1), शिवशंकर कॉलनी (4), पवन नगर (1), जाफर गेट (1), पद्मपुरा (14), दशमेश नगर (1), गजानन नगर (2), रमा नगर (1), सुरेवाडी (1), जालान नगर (3), ज्योती नगर (1), छावणी (2), राम नगर (1), फुले चौक, औरंगपुरा (1), एसटी कॉलनी (1), जाधववाडी (3), टीव्ही सेंटर (2) 
ग्रामीण भागातील रूग्ण : (67)
दत्त नगर, रांजणगाव (2), रांजणगाव (2), कराडी मोहल्ला, पैठण (1), वरूड काझी (1), सारोळा, कन्नड (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), अजिंठा (20), वडगाव कोल्हाटी (1), सिडको बजाज नगर (1), वडगाव साईनगर, बजाज नगर (1), छत्रपती नगर, वडगाव (2), वडगाव, बजाज नगर (1), विश्व विजय सो., बजाज नगर (1), एकदंत सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), वळदगाव (1), सुवास्तू सो., बजाज नगर (1), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (6), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (4), साराकिर्ती, बजाज नगर (2), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (2), पाटोदा, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (2), अन्य (1), बालाजी सो., बजाज नगर (4), लक्ष्मी नगर, पैठण (4), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.