विहामाडंवा । वार्ताहर
पैठण तालुक्यातील ग्रामिण भागात कोरोणा या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असुन विहांमाडवा येथे सोमवारी कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक सह तालुका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात धावपळ करत या रूग्णाच्या निकट संपर्कातील जवळपास सोळा जनांचे स्वँब नमुने घेऊन तपासणीसाठी औरंगाबादला पाठवले होते.
यातील 42 वर्षिय पुरुष व्यक्तीस कोरोणा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त होताच गाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले, यातील पंधरा लोकांना आता होम काँरंटाईन करण्यात आले असुन नव्याने बाधीत रुग्णाच्या निकटसंपर्कातील अकरा लोकांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले सदरील व्यक्तीचे नातेवाईकांचे दि. 8 जुलै रोजी स्वाब घेतल्या जाणार असल्याची माहिती येथिल वैद्यकिय अधिकारी यादव सोनकांबळे यांनी दिली
Leave a comment