अजिंठा पोलिसांचा कडक बंदोबस्त, तर लॉकडाऊन कायम

शिवना । वार्ताहर

जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना विषाणूने सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात शिरकाव केला आहे. गावातील दीडफुटी गल्ली भागात राहणार्‍या एक 26 वर्षीय पुरुषची कोरोना तपासणी वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता खबरदारी म्हणून प्रशासनाने सोमवार सकाळपासून दीडफुटी गल्ली परिसर सील केला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील  23 जणांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. व त्यातील 7 जणांचे कोरोना तपासणी साठी लाळेचे नमुने पाठविण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुगणाला सर्दी, खोकला, ताप, दिसून आल्याने त्याचे लाळेचे नमुने घेण्यात आले होते. ( दि.06) रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसरात्र प्रभावी उपाय योजना करणार्‍या प्रशासनाची झोप उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी तात्काळ बैठक घेतली आहे. शिवना ग्रामपंचायतने मागील तीन दिवसापासून शिवना गाव लॉकडाऊन केले होते. गावचे सरपंच संतोष जगताप दै. आनंद नगरी शी बोलताना म्हणाले की समोरील काही दिवस लॉकडाऊन कायम राहील. व 100%  कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय सेवा व औषधी दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहील. त्याच बरोबर तोंडाला मास्क न लावणार्‍या व विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करून गुन्हे दाखल करणयात येईल, असा इशारा अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी दिला आहे. यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, बीडीओ प्रकाश दाभाडे, नायब तहसीलदार विनोद कर्मनकर विस्तार अधिकारी दौड, ग्रामसेवक रवींद्र पाटील, तलाठी विशाल शेलकर, सरपंच संतोष जगताप, उपसरपंच अरुण काळे, जि. प्र. सदस्य गजानन राऊत पं.स.सदस्य सलीम शेख, वैद्यकीय अधिकारी अकिब सय्यद, शेख , डॉ. जावेरिया.डॉ चौधरी, आरोग्य सेवक प्रवीण जाधव, अनिल पवार, आरोग्य कर्मचारी शेख वाजेद, यांनी पाहणी करून दीडफुटी गल्ली परिसर सील केला. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार रविकिरण भारती, दिपक भंगाळे, अनंत जोशी, अजय मोतींगे यांनी कडक बंदोबस्त केला आहे

शिवना वासीयांना दिलासा

दि 6 शिवना येथे कोरोना पोझिटिव्ह निघालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे आरोग्य विभागाने स्वॅब नमुने घेतले होते. या सातही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची महिती शिवन्याच्या आरोग्य आधिकारि डॉ. जावेरिया शेख यानी  लोकप्रश्न  शी बोलतांना दिली. यात आमसरी येथील एक व अजिंठ्याच्या पन्नास संशयितांचे स्वैब नमूने घेतलेले असून त्याचा अहवाल आज चार वाजेपर्यंत हाती येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.