औरंगाबाद । वार्ताहर
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी दत्तप्रसाद अंबिलवादे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय संघाटत्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी दत्तप्रसाद अंबिलवादे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नियुक्ती चे केंद्रीय सरचिटणीस अशोक सवळे, राजेंद्र भुरे, अशोक पवार यांच्या सह राज्याचे पदाधिकारी यांनी या निवडीसाठी अनुमोदन केले. पत्रकारिता सह सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातत सतत अग्रेसर मितभाषी कुशल संघटक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून दत्तप्रसाद अंबिलवादे यांची ओळख आहे.
मराठवाडा व स्नेहीजनासाठी ही निवड अभिमास्पद बाब आहे , दत्तप्रसाद अंबिलवादे आपल्या कर्तव्यतत्परतेने कुशल संघटक गुणवत्ता व्दारे कार्यरतेने समस्या चे निराकरण करून न्याय व हक्क मिळवून देत आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेशी आदर्शवत कामगिरी व्दारे लौकिकता प्राप्त करून मराठवाडा विभागीयाचे नाव सर्वदूर करतील ,व नियुक्ती बद्दलचा संघटनेच्या क्षेष्टिजणाचा विश्वास सार्थक करतील असा विश्वास करत आम्ही सर्व स्नेहीजन या निवडीचे हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी निवडीचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. निवडी बाबत बोलताना अध्यक्ष दत्तप्रसाद अंबिलवादे यांनी संघटना बांधणी सह संघटनेच्या उदेश्यानुसार कायर्रत राहून क्षेष्टीजनाचा विश्वास सार्थ करील अशी ग्वाही त्यांनी दिली.
Leave a comment