औरंगाबादमध्ये घाटीत चार, खासगीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

जालन्यात 13 पॉझिटिव्ह; एकूण मृत्यू 30

औरंगाबाद । वार्ताहर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 253 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3824 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 145 तर  ग्रामीण भागातील 108 जणांचा समावेश आहे. आज एकूण 194 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7134 एवढी झाली आहे. आजपर्यंत 327 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 2983 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज दिवसभरात वाढलेल्या 194 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 139 तर ग्रामीण भागातील 55 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

घाटीत चार, खासगीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सहा जुलै रोजी औरंगाबाद शहरातील शरिफ कॉलनीतील चार वर्षीय मुलगा, वाळूजमधील 47 वर्षीय स्त्री, चेतना नगरातील 53 वर्षीय पुरूष,  वैजापुरातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  घाटीत आतापर्यंत 255 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 247 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. शहरातील एका खासगी रुग्णालयात 6 जुलै रोजी सावरकर कॉलनीतील 56 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 7 जुलै रोजी एन आठ सिडकोतील 78 वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील  47 वर्षीय पुरूष, दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात फाजलपुर्‍यातील 45 वर्षीय पुरूष आणि तानाजी चौक, शिवशंकर कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 247, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 78, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा  एकूण 327 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जालन्यात 13 पॉझिटिव्ह; एकूण मृत्यू 30

तेवीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

प्रलंबित असलेल्या 127 नमुन्यांपैकी केवळ 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात 12 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. सोमवारी सायंकाळी एका 57 वर्षीय महिलेच्या मृत्यू नंतर शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली येथील रहिवाशी असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधीत बळींची संख्या 30 वर पोहचली आहे. आज मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यामध्ये जालना शहरातील कॉलेज रोडवरील 3, जागडा नगर 2, नलगल्ली 2, शेरसवासर नगर, सिंनगाव राजा जालना, मस्तगड, जेईएस कॉलेज जवळ, मिशन हॉस्पिटल निवासस्थान प्रत्येकी 1 आणि जालना तालुक्यातील मानदेऊळगाव येथील एकाचा समावेश असून या 13 रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 813 झाली आहे. आजपर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

जालना शहरातील सदर बाजार 01, जिल्हा सामान्य रुग्णालय 01, मस्तगड 03, जे.पी.सी.बँक कॉलनी 01,बरवार गल्ली 03,मंगळ बाजार 01, मिशन हॉस्पिटल रोड 01, वसुंधरा नगर 03,आर. पी. रोड 01, संभाजी नगर 01, रहेमानगंज 03, नाथबाबा गल्ली 01, दानाबाजार 03 अशा एकूण 23 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.