घाटीत आठ, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 197 जणांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत 3571 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सुटी दिलेल्या 197 रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 116 तर ग्रामीण भागातील 81 जणांचा समावेश आहे. आज एकूण 210 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातीत एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6940 एवढी झाली आहे. आजपर्यंत 319 जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण 3050 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या 210 रुग्णांपैकी औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 157 तर ग्रामीण भागातील 53 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सायंकाळ नंतर वाढलेल्या 60 रुग्णांमध्ये 29 पुरूष तर 31 महिला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सायंकाळनंतर वाढलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे
औरंगाबाद शहरातील रुग्ण (56)
रुणवाल रेसिडेन्सी, (2), हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा (1), नारळीबाग (2), अन्य(1), संभाजी कॉलनी (3), अविष्कार कॉलनी एन-6 सिडको (1), विठ्ठल नगर, कांचनवाडी (8), दत्तनगर कांचनवाडी (2), कांचनवाडी (1), शिवाजी नगर (3), रेणुका नगर (4), एमरॉल्ड सिटी (1), भारत नगर (3), छत्रपती नगर (7), विश्व भारती कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (1), ज्युबली पार्क (1), जयभवानी नगर (1), बालाजी नगर (1), जाधवमंडी (1), अमृतसाई, रेल्वेस्टेशन (1), हर्सुल (1), उत्तमनगर (1), बेगमपुरा (1), सुधाकर नगर, सातारा परिसर (1), नक्षत्रवाडी (1), बीड बायपास(1), एन-11 मयुर नगर (2), गजानन कॉलनी (2),
ग्रामीण भागातील रुग्ण (4)
फुलंब्री (1), कन्नड (2), पोलिस कॉलनी कन्नड (1), या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत आठ, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येथे पडेगांव येथील 55 वर्षी पुरूषाचा, एस.टी कॉलनीतील 71 वर्षीय स्त्री, अजिंठा येथील 70 वर्षीय महिलेचा, म्हाडा कॉलनीतील 37 वर्षीय पुरूषाचा, एन 11 हडको येथील 53 वर्षीय पुरुषाचा, जाधववाडी येथील 53 वर्षीय महिलेचा, एन 9 सिडको येथील 60 वर्षीय पुरूषाचा तर न्यु हनुमान नगर येथील 62 वर्षीय पुरुषाचा तर शहरातील एका खासगी रुग्णालयात राजा बाजार येथील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 319 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
 
                               ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment