औरंगाबाद । वार्ताहर
जलदूतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात फेरोसिमेंटचा बंधारा बांधलाय, पण याहीवर्षी विक्रमी पाऊस होतोय आणि डोंगरातून वेगाने येणार्या पुराच्या पाण्याने बंधार्या समोरचे दगड निखळले होते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोरोना मुळे मोजक्याच जलदूतांनी एकत्र येऊन श्रमदान करीत हे सर्व दगड पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला, पण भरावाची माती भरपूर वाहून गेलीय. यावेळी मास्क व सोशल डिस्टनसिंगचे पालन सर्वांनी केले. जलदूतचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या नेतृत्वात हे जलसंवर्धनाचे कार्य हे युवक करीत आहेत.
या बंधार्यामुळे बाजूच्या विहिरींच्या पाणी पातळीत 40 फुटाने झालेली वाढ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या बंधार्यामुळे यावर्षी नर्सरीसाठी एकही टँकर पाणी घ्यावे लागले नाही. यावेळी देवगिरी बँकेचे कर्मचारीही या श्रमदानात सामील झाले होते. यावेळी अमोल मुळे, विकास ठाले, विश्वास देव, शुधोधन जगताप, उमेश राऊत, देवगिरी बँकेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, व्यंकटेश कुलकर्णी, दत्ता शिंदे, अरविंद गुंगे, काशीनाथ दाबके, विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी, प्रदीप खोतकर, विश्वजीत देशपांडे हे सहभागी झाले होते.
Leave a comment