औरंगाबाद । वार्ताहर
कत्तलखान्यात गायी घेऊन जाणार्या पिकअपचा पाठलाग करून पोलिसांनी एका आरोपीसह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अझहर मुक्तार शहा, (रा.गारखेडा, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील जिल्हा बॉर्डर सिलिंग चेक पोस्ट कायगाव टोका येथील नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणारा एक पांढर्या रंगाचा पिकअप क्रमांक (चक 20 एॠ 9004) दिसून आला. पोलिसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करून राधिका पेट्रोल पंपासमोर पिकअप पकडला असता त्यामध्ये गायींची अवैधपणे वाहतूक करताना दिसून आले. त्यामध्ये 2 लाख 40 हजार रुपयांच्या गायी व 8 लाख रुपयांचा पिकअप असा एकूण 10 लाख 40 हजार रुपायांचा मुद्देमाल मिळून आला. सदरची कारवाई , मा. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे , सो.पोउपनी अर्जुन चौधर ,पोहेका अब्दुल रज्जाक, पोशि चालक चव्हाण यांनी केली.
Leave a comment